कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी विठ्ठलपंत शिंदे सर यांची नियुक्ती
सांगोला (प्रतिनिधी) आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी विठ्ठलपंत शिंदे सर यांची सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आली.
प्रशालेत सुरुवातीस संस्थापक वामनराव शिंदे साहेब व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन प्रमुख मान्यवर हरिराम बाबर सर ,उद्धव पाटील, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
नंतर संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांच्या हस्ते नूतन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश सुर्वे, दिग्विजय चव्हाण सर, रामभाऊ शिंदे, ॲड बबनराव पाटील यांनी
शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
यावेळी नूतन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांनी सदर नेमणुकीबद्दल संस्थेचे आभार मानून या पुढील काळात प्रशालेचे कामकाजा बरोबरच ,विद्यालयाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे सर, सूत्रसंचालन भालके मॅडम, आभार अर्चना गोडसे मॅडम यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


0 Comments