Breaking News

"बोगस सह्यांचा स्फोट! विधान परिषद निवडणुकीत न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा उमेदवारी अर्ज बाद; गुन्हा दाखल होणार?"

"बोगस सह्यांचा स्फोट! विधान परिषद निवडणुकीत न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा उमेदवारी अर्ज बाद; गुन्हा दाखल होणार?"


सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत

 एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बोगस सह्यांच्या आरोपामुळे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार अशोक वाघमोडे 

यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे निवडणूक 

वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधित उमेदवाराविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

दरम्यान, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून अशोक वाघमोडे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात

 उतरण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाच्या छाननीदरम्यान गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले.

निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्जासोबत 10 सूचक व अनुमोदकांची नावे जोडण्यात आली होती. 

यातील 5 लोकप्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहत लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले.

 संबंधित उमेदवाराला आपण ओळखत नसल्याचा दावा करत अर्जावरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 तसेच आपल्या नावाचा व स्वाक्षरीचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

या आक्षेपांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी केली. 

सादर करण्यात आलेल्या कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रांच्या आधारे उमेदवारी अर्ज कायदेशीर निकषांनुसार अवैध ठरवत तो बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या प्रकारामुळे संबंधित लोकप्रतिनिधींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या आणि बनावट सह्यांचा वापर केल्याचा आरोप

 असलेल्या उमेदवाराविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून किंवा निवडणूक प्रशासनाकडून पुढील कायदेशीर पावले उचलली जातात का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments