Breaking News

सांगोला तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांना विकासाची गती;आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश, ३ कोटींचा निधी मंजूर

 


सांगोला तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांना विकासाची गती;


आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश, ३ कोटींचा निधी मंजूर

सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व उन्नतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून तालुक्यातील विविध गावांतील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि जोडरस्त्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत.

ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत ग्रामविकास विभागाने ३ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

या निधीतून देवळे–महमदाबाद, कोळे–तिप्पेहळ्ळी–घोरपडी ते जिल्हा हद्द, महिम–गार्डी, नाझरे–अजनाळे, चिंचोली–शिनगारेवस्ती, जवळा–आगलावेवाडी, 

नरळे–कोंडग–बाबरवस्ती, तसेच विविध वस्ती व जोडरस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब असल्याने शेतमाल बाजारपेठेत पोहोचवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मंजूर निधीतून रस्त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर वाहतुकीचा वेळ कमी होईल, प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निधी मंजूर झाल्यानंतर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

ग्रामीण भागातील १४ महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणार मोठा लाभ

Post a Comment

0 Comments