आलदर हॉस्पिटलच्या वतीने बुध्देहाळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने आलदर लहान मुलांचे हॉस्पिटलच्या वतीने बुध्देहाळ (ता. सांगोला) येथे मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:००या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बुध्देहाळ येथे पार पडणार आहे.
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शिबिरात येणाऱ्या पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना
या योजनांच्या माध्यमातून गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
“ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत वैद्यकीय सोयी-सुविधा पोहोचाव्यात यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला परिसरातील आणि बुध्देहाळ गावातील जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.” व अधिक माहितीसाठी ९०२९० ४४००९ नंबर वर संपर्क करा असे आवाहन डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.


0 Comments