Breaking News

रोलर अंगावरुन गेल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; बार्शीतील क्रिकेट शिबिरातील धक्कादायक घटना

रोलर अंगावरुन गेल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; बार्शीतील क्रिकेट शिबिरातील धक्कादायक घटना


सोलापूर: बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक दुर्घटना घडली आहे. 

क्रिकेट खेळपट्टी दाबण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे ३५० किलो वजनाचा अवजड लोखंडी रोलर अंगावरून गेल्याने 

आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५, रा.सुभाषनगर, बार्शी) या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देवडवार (दोघेही रा. बार्शी), संतोष ठोंबरे व मातृभूमी प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ आणि बार्शी तालुका क्रिकेट 

असोसिएशन मंडळाच्या सर्व संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

 करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रचंड खळबळ उडाली असून, पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आरवचे वडील योगीराज नारायण चौधरी (वय ४५) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 'मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी' आणि 'बार्शी तालुका क्रिकेट 

असोसिएशन मंडळा'च्या वतीने सहा ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी आरवच्या वडिलांनी ३,५०० रुपये फी भरली होती.

३० मे रोजी सकाळी मैदानावर सराव सुरू असताना, खेळपट्टी व्यवस्थित करण्यासाठी तिथे असलेला अवजड लोखंडी रोलर फिरवण्याचे ठरले;

 परंतु रोलर चालवण्यासाठी कोणतीही मोठी व्यक्ती, ट्रॅक्टर किंवा तज्ज्ञ मजूर मैदानावर उपस्थित नव्हता.

 मैदानावर उपस्थित असलेले क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देवडवार यांनी १२ ते १५ वर्षे वयोगटातील लहान मुलांनाच रोलर ओढण्यास सांगितले. 

अचानक आरवचा पाय घसरला आणि तो खेळपट्टीवर खाली पडला. रोलरचा वेग आणि प्रचंड वजन यामुळे इतर लहान मुलांना रोलर

 तत्काळ रोखता आला नाही. परिणामी, तो रोलर थेट आरवच्या छातीवरून आणि पायावरून गेला. 

या भीषण अपघातात आरवच्या शरीराला गंभीर अंतर्गत दुखापत झाली आणि अंतर्गत अवयव निकामी होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला.

 मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आरवला पाहून इतर मुलांनी आणि पालकांनी एकच हंबरडा फोडला.

या संपूर्ण दुर्घटनेला क्रिकेट कॅम्पचे आयोजक आणि प्रशिक्षक यांचा अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप 

आरवच्या वडिलांनी केला आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश अंबादास गळगटे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments