सोलापूर हादरले! बायकोसाठी ७ मिनिटांचा व्हिडीओ बनवला, नंतर तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर हादरले.
पहिल्या घटनेत सेंट्रिंगचे काम करणाऱ्या तरुणाने बायकोसाठी ७ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून नंतर राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
दुसऱ्या घटनेत एका तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. तर तिसऱ्या घटनेत एका सुरक्षारक्षकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. या तिन्ही घटनांचे तपास सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाकीर अब्दुल रजाक पटेल (वय ३८ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो इंदिरा नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी बायकोसाठी ७ मिनिटांचा शेवटचा व्हिडीओ
तयार करून नंतर आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जाकीरने आनंद नगर भाग- १ येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली. पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, जाकीरचे बायकोसोबत सकाळी भांडण झाले होते. या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्या
च्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याच्या पश्चात बायको आणि दोन मुलं असा परिवार आहे.


0 Comments