कार्यकर्त्याच्या कुटुंबाला दिलासा; ना. डॉ. रामदास आठवले यांच्याकडून जाहीर केलेली ₹1 लाखांची मदत खात्यावर जमा
सांगोला | प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे निष्ठावंत कार्यकर्ते तथा नराळे (ता. सांगोला) येथील स्वर्गीय नितीन जगन्नाथ वाघमारे यांच्या कुटुंबाला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय
अध्यक्ष Ramdas Athawale यांनी दिलासा दिला आहे. त्यांच्या अपघाती निधनानंतर जाहीर करण्यात आलेली ₹1 लाखांची आर्थिक मदत वाघमारे कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वर्गीय नितीन वाघमारे यांच्या निधनानंतर ना. आठवले यांनी नराळे येथे जाऊन कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत सांत्वन केले होते.
यावेळी त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही मदत आता प्रत्यक्ष खात्यावर जमा झाल्याने वाघमारे परिवाराला मोठा आधार मिळाला आहे.
या प्रसंगी ना. आठवले यांनी दिवंगत कार्यकर्त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पक्ष विसरणार नसल्याचे सांगत, त्यांच्या मुलाला शासकीय सेवेत संधी मिळावी यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती.
संकटाच्या काळात पक्ष नेतृत्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या कृतीतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.
रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, स्वर्गीय नितीन वाघमारे यांच्या कुटुंबाला न्याय आणि आधार मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्वर्गीय नितीन जगन्नाथ वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐


0 Comments