Breaking News

सोलापूर ZP कडून इंधन बचतीचा निर्णय; अध्यक्ष एसटीने, उपाध्यक्ष सायकलवर

सोलापूर ZP कडून इंधन बचतीचा निर्णय; अध्यक्ष एसटीने, उपाध्यक्ष सायकलवर


सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन व काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेने (ZP) मोठा निर्णय घेतला आहे. 

प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी वाहनांचा वापर करणार नाहीत. हा निर्णय लागू करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली ठरली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य एसटी बसने कार्यालयात येणार असून उपाध्यक्ष इंद्रजित पवार सायकलने जिल्हा परिषदेत उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व कर्मचारी

 आणि पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी पेट्रोल-डिझेलवरील वाहनांचा वापर करणार नाहीत, असा परिपत्रकाद्वारे निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र नागरिकांवर कोणतेही निर्बंध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचे आवाहन

आखाती देशांतील तणाव आणि संभाव्य ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासीयांना इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक वापर, 

कारपूलिंग आणि शक्य तिथे वर्क फ्रॉम होम स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. यामागे इंधन आयात खर्च आणि परकीय चलनावरील दबाव कमी करणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधानांची प्रमुख आवाहने

पेट्रोल-डिझेलचा जपून वापर

खाद्यतेलाची बचत

पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळणे

परदेश प्रवास मर्यादित करणे

कच्च्या तेलाची आयात कमी करण्यावर भर

परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे

मेट्रो व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे

ऑनलाईन बैठकांवर व वर्क फ्रॉम होमवर भर

परदेशी उत्पादनांची खरेदी कमी करणे

दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ला कायदेशीर मान्यता देण्याची मागणीही जोर धरू लागली असून आयटी कर्मचारी संघटनांनी याबाबत सरकारला निवेदन दिले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचा हा निर्णय प्रशासनिक पातळीवर इंधन बचतीचा संदेश देणारा ठरला आहे.

Post a Comment

0 Comments