Breaking News

हणमंतगावमध्ये शेत वादातून महिला जखमी; चाकू हल्ला, दाम्पत्यावर गुन्हा

हणमंतगावमध्ये शेत वादातून महिला जखमी; चाकू हल्ला, दाम्पत्यावर गुन्हा


सांगोला : सांगोला तालुक्यातील हणमंतगाव येथे शेतातील वादातून एका महिलेवर चाकूने हल्ला करून मारहाण केल्याची घटना

 रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात संबंधित दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 10 मे) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शेत परिसरात ही घटना घडली. आरोपी त्यांच्या शेतातील 

दगड व काटे शेजारील शेतात टाकत असल्याचे संबंधित महिलेला दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला.

वाद चिघळत गेल्यानंतर आरोपी वसंत मंडले यांनी खिशातील चाकू काढून महिलेच्या डाव्या हातावर वार करून तिला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 तसेच त्यांच्या पत्नीने संबंधित महिलेसोबत झोंबाझोंबी करत तिला खाली पाडले, शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 406/2026 नोंदविण्यात आला

 असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 351(2), 351(3), 352 आणि 3(5) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक/1248 नलवडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments