जनगणना कर्तव्यात जीव गमावलेल्या शिक्षकांना न्याय द्या; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट;
राज्यभरातील पीडित कुटुंबांसाठी मदतीची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीच्या सहाय्याची मागणी
सांगोला / मुंबई : राष्ट्रीय जनगणना-२०२७ चे काम पार पाडताना उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या
सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील आदर्श शिक्षक कै. राजेंद्र दामोदर ढोले यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी,
तसेच राज्यातील अशाच इतर घटनांनाही समान न्याय मिळावा, अशी ठाम मागणी
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार देशमुख यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. जनगणनेचे काम अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू
असून, सध्या राज्यात वाढलेल्या उष्णतेमुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आमदार देशमुख यांनी सांगितले की, कै. राजेंद्र ढोले हे शासनाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना उष्माघाताचे बळी ठरले.
त्यांच्या निधनामुळे ढोले मळा परिसरातील त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
मात्र, हा प्रश्न केवळ सांगोला तालुक्यापुरता मर्यादित नसून राज्यातील अनेक भागांत जनगणना कामात गुंतलेल्या शिक्षकांना उष्णतेचा गंभीर फटका बसत आहे.
काही ठिकाणी शिक्षकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत असल्याने शासनाने तातडीने व्यापक धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार देशमुख यांच्या प्रमुख मागण्या
जनगणना कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कै. राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला शासन नियमानुसार तातडीने अनुग्रह अनुदान मंजूर करावे.
कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये घडलेल्या अशाच घटनांची माहिती गोळा करून सर्व पीडित कुटुंबांना समान मदत द्यावी.
उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन जनगणनेच्या कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करावा.
शिक्षकांसाठी ORS, प्रथमोपचार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून सुरक्षिततेचे ठोस धोरण राबवावे.
या मागण्यांमुळे राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.राज्यभरातील पीडित कुटुंबांसाठी मदतीची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीच्या सहाय्याची मागणी
सांगोला / मुंबई : राष्ट्रीय जनगणना-२०२७ चे काम पार पाडताना उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील आदर्श शिक्षक कै. राजेंद्र दामोदर ढोले यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी,
तसेच राज्यातील अशाच इतर घटनांनाही समान न्याय मिळावा, अशी ठाम मागणी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार देशमुख यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. जनगणनेचे काम अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू
असून, सध्या राज्यात वाढलेल्या उष्णतेमुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आमदार देशमुख यांनी सांगितले की, कै. राजेंद्र ढोले हे शासनाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना उष्माघाताचे बळी ठरले. त्यांच्या निधनामुळे ढोले मळा परिसरातील त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
मात्र, हा प्रश्न केवळ सांगोला तालुक्यापुरता मर्यादित नसून राज्यातील अनेक भागांत जनगणना कामात गुंतलेल्या शिक्षकांना उष्णतेचा गंभीर फटका बसत आहे. काही ठिकाणी शिक्षकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत असल्याने शासनाने तातडीने व्यापक धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार देशमुख यांच्या प्रमुख मागण्या
जनगणना कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कै. राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला शासन नियमानुसार तातडीने अनुग्रह अनुदान मंजूर करावे.
कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये घडलेल्या अशाच घटनांची माहिती गोळा करून सर्व पीडित कुटुंबांना समान मदत द्यावी.
उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन जनगणनेच्या कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करावा.
शिक्षकांसाठी ORS, प्रथमोपचार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून सुरक्षिततेचे ठोस धोरण राबवावे.
या मागण्यांमुळे राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments