Breaking News

सांगोल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजवंदन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

सांगोल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजवंदन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): दि. ०१ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सांगोला येथे राष्ट्रीय ध्वजवंदनाचा शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

 या सोहळ्याला विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सांगोला, नगरपरिषद सांगोल्याचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक व दुय्यम निबंधक तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,

 विविध मान्यवर, माजी सैनिक, पत्रकार बंधु-भगिनी, तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजवंदनानंतर ग्राम महसूल अधिकारी कमलापूर येथील श्री. गणेश पंडित यांनी प्रस्तावना मांडली. त्यानंतर तहसीलदार कुबाजुताई भागवत यांनी मा. आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांचा मा. आमदारांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

तहसीलदार कु. बाळुताई भागवत यांनी मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. 

यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची रंगत वाढवत श्री. शिवाजी इंगोले यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. शेवटी श्री. गणेश पंडित यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments