सांगोला–मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारमधील प्रवासी किरकोळ जखमी
सांगोला : सांगोला–मंगळवेढा रोडवरील चाळीस धोंडा परिसरात दोन कारमध्ये झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
या अपघातात दोन्ही वाहनांतील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारमध्ये तेलंगणा राज्यातील प्रवासी होते. या वाहनात दोन महिला,
तीन लहान मुले आणि दोन पुरुष प्रवास करत होते. अपघातात या सर्वांना किरकोळ दुखापती झाल्या.
दुसरी कार मंगळवेढा येथील असून त्यामध्ये एकच व्यक्ती प्रवास करत होता.
अपघातानंतर त्या व्यक्तीला कारमध्ये अडकलेल्या अवस्थेतून काच फोडून बाहेर काढण्यात आले.
त्यालाही किरकोळ जखमा झाल्या असून पुढील उपचारासाठी मंगळवेढा येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य केले. काही वेळातच मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे घटनास्थळी दाखल होऊन जखमींची विचारपूस केली.
या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.


0 Comments