सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उत्साहात उद्घाटन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे नव्याने पाचवीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वासंतिक वर्गाचे उत्साहात उद्घाटन झाले.
कार्यक्रम प्रारंभी संस्थापक अध्यक्ष, गुरुवर्य कै.चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बिभीषण माने, उपमुख्याध्यापक चारुदत्त जगताप, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक काकासो नरुटे, प्रदीप धुकटे उपस्थित होते.
प्राचार्य बिभीषण माने यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये नव्याने प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन करत स्वागत केले. तसेच पालकांना पाल्याची जबाबदारी आमच्यावर देत निर्धास्त राहण्याचे आवाहन केले.
शाळेमध्ये विस्तीर्ण विषयज्ञान असणारे शिक्षक, विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून शाळेवर विश्वास बाळगत प्रवेशित झाल्याबद्दल पालकांचे आभार मानले.
सदर वासंतिक वर्ग इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे नि:शुल्क असणार असून यामधून विद्यार्थ्यांचा शालेय तसेच इतर उपक्रमांमधून व्यक्तिमत्व विकास साधला जाणार आहे.
वासंतिक वर्गाच्या पूर्ण कालावधीसाठी सांगोला शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा मोफत राहणार असून पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना धन्यवाद दिले.
उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित पालकांमधून श्री.महादेव घोंगडे व सौ.अमृता येलपले यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट
विद्यार्थ्यांचे स्वागत बिस्किटे वाटून करण्यात आले. बलून्स डेकोरेशन व सेल्फी पॉईंटमुळे विद्यार्थी आनंदीत झाले. विद्यार्थ्यांना वह्या वाटप व पालकांना चहापान करण्यात आले.*
सकाळी 8:00 ते 10:20 या वेळेत हे वासंतिक वर्ग 22 मे, 2026 अखेर सुरू राहणार
असून कार्यवाही विषयी माहिती प्रास्ताविकातून नरेंद्र होनराव यांनी देत विद्यार्थ्यांना शालेय परिसराची ओळख करून दिली. शिस्तविषयक सूचना वैभव कोठावळे यांनी देत विद्यार्थी व पालकांना शाळेतील अभ्यासाच्या नियोजनाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सांगोला शहरातील व आसपासच्या परिसरातील पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक काकासो नरुटे यांनी केले.


0 Comments