Breaking News

“शिक्षणात गुणवत्ता, प्रशासनात गती; सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा विकासाचा ध्यास” शिक्षण व आरोग्य सभापती मा.चेतनसिंह केदार सावंत

“शिक्षणात गुणवत्ता, प्रशासनात गती; सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा विकासाचा ध्यास” शिक्षण व आरोग्य सभापती मा.चेतनसिंह केदार सावंत




करमाळा : जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभागाची मासिक आढावा बैठक पंचायत भवन, करमाळा येथे उत्साहात पार पडली. 



शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला.

बैठकीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या विविध योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह सुविधा, क्रीडा विकास आणि शाळांच्या प्रशासनिक कामकाजाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषद प्रशाला माढा येथील विविध प्रलंबित प्रश्न, रिक्त पदे, ‘पवित्र’ पोर्टल, सेवार्थ प्रणाली तसेच शाळा इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडीटसंदर्भातील प्रस्तावांचा देखील बैठकीत आढावा घेण्यात आला. 

अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू असून ११६ शिक्षकांचे समायोजन पूर्णत्वाकडे असून ६७२ रिक्त पदांबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयांची गोडी निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले.

 तसेच आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर व माळशिरस तालुक्यात तब्बल ५ लाख सीडबॉल तयार करून वारकऱ्यांना वाटप करण्याचा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

नवभारत साक्षरता अभियान, इयत्ता ११ वी व १२ वीतील EBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना आणि शिक्षण क्षेत्रातील विविध सुधारणा यावरही यावेळी चर्चा झाली.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, श्रुतीताई भोरगुंडे, सुषमाताई नारनवर, पंचायत समिती मंगळवेढा सभापती दिपालीताई ताड, पंचायत समिती करमाळा सभापती पूजाताई ढेरे, 

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (योजना) सुलभाताई वठारे तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments