Breaking News

चिकमहुद-लक्ष्मीनगर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

चिकमहुद-लक्ष्मीनगर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त


सांगोला तालुक्यातील चिकमहुद व लक्ष्मीनगर गावांच्या शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी धाड टाकत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकलींसह तब्बल ४ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सांगोला पोलीस ठाण्यात दखलपात्र अहवाल क्रमांक ४३९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) 

अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल अरुण खराडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिकमहुद-जाधववाडी परिसरातील राजेवाडी कॅनॉललगत पांडुरंग जाधव यांच्या पडीक शेतातील झाडाखाली 

काहीजण ५२ पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या कारवाईत शरद येडवे, दऱ्याप्पा गोडसे, बाबासो नरळे, चंद्रशेखर गोडसे, संग्राम गोडसे, समाधान ऐवळे, निवास ऐवळे, सोमनाथ गोडसे (सर्व रा. लक्ष्मीनगर) तसेच अनिल चव्हाण (रा. जाधववाडी, चिकमहुद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यात ४,५०० रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे पत्ते, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच अनेक दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

 जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ३४ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोना/८३५ लेंगरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments