Breaking News

“वाढदिवसाचा अनोखा आदर्श!” — राजाभाऊ गुळीग यांनी वृद्धाश्रमात फळे व खाऊ वाटून साजरा केला वाढदिवस

“वाढदिवसाचा अनोखा आदर्श!” — राजाभाऊ गुळीग यांनी वृद्धाश्रमात फळे व खाऊ वाटून साजरा केला वाढदिवस


सांगोला : आजच्या दिखाऊ वाढदिवसांच्या गर्दीत समाजकार्याचा वेगळा आदर्श निर्माण करत सकल 

होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ गुळीग यांनी आपला वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली.

भीमशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे जन्मतराज संपादक रवींद्र कांबळे शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे

यावेळी सकल होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ गुळीग ,प्रदेश सचिव समाधान जावीर,प्रदेश उपाध्यक्ष सुशांत ऐवळे, सोलापुर जिल्हा युवक अध्यक्ष अक्षय दादा भजनवळे

सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देत त्यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांना केळी, बिस्कीट, फरसाण व इतर खाऊचे वाटप केले.

 वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि हास्य हेच आपल्या वाढदिवसाचे खरे गिफ्ट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

राजाभाऊ गुळीग हे सांगोला तालुक्यातील होलार समाजासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

 समाजातील गोरगरिबांना आधार देणारा, दिलदार मनाचा आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारा युवा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव तसेच 

गावागावातील नागरिकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “वाढदिवस असावा तर असा” अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments