सांगोला विद्यामंदिर राज्यस्तरीय 'आदर्श शाळा' पुरस्काराने सन्मानित
सांगोला: (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजला शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल
'एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना' आणि 'स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था,
सोलापूर' यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा 'राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
प्रशालेने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध शैक्षणिक कामकाजात सातत्य राखल्याबद्दल हा बहुमान मिळाला आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना प्रशालेचे प्राचार्य बिभीषण माने , उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे,काकासो नरूटे उपस्थित होते.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजला मिळालेल्या या राज्यस्तरीय यशामुळे सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,
उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,
संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य बिभीषण माने, उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप,
उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, काकासो नरूटे, उत्तम सरगर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले..
या गौरवामुळे सर्व स्तरांतून सांगोला विद्यामंदिर परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


0 Comments