कमलापूरजवळ भीषण अपघात; भरधाव एसटीची टँकरला धडक, चालकासह ७ जखमी
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील कमलापूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वर शनिवारी (दि. 2 मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात घडला.
भरधाव वेगात धावणाऱ्या एसटी बसने समोरील पाणी टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चालकासह सात प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवण आगाराची एसटी बस सांगली–सोलापूर मार्गावरून प्रवास करत असताना हा अपघात झाला.
कमलापूरजवळील पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने टँकरला धडक दिली.
धडक इतकी तीव्र होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तसेच टँकरचेही नुकसान झाले.
या अपघातात बस चालक जगदीश पाटील हे गंभीर जखमी झाले असून प्रवासी सुहाना शेख
(सांगली), लहु मोहीते (तिप्पेहाळ्ळी), नजर पठाण (सलगरे), प्रकाश कदम, मिलींद कदम (निपाणी) व गुलशान शेख (सांगली) हे जखमी झाले आहेत.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ बोराटे पुढील तपास करत आहेत.


0 Comments