खळबळजनक.. हॉटेलच्या स्वयंपाकघरात विवाहितेची आत्महत्या; मंगळवेढ्यात खळबळ
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे एका २५ वर्षीय विवाहितेने हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.
रोहिणी नीलेश पाराधे (वय २५, रा. ब्रम्हपुरी, ता. मंगळवेढा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मंगळवार (दि. २६ मे) रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात
रोहिणी यांनी ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे आढळून आले.
ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत महिलेचे पती नीलेश विलास पाराधे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अल्पवयीन विवाहितेच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे ब्रम्हपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments