Breaking News

सांगोला नगरपरिषदेचा महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात; ध्वजारोहण, सन्मान आणि स्वगणनेचे आवाहन

सांगोला नगरपरिषदेचा महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात;


ध्वजारोहण, सन्मान आणि स्वगणनेचे आवाहन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत

 सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात

 ध्वजारोहण सोहळा पार पडला. शहरातील नागरिक, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत देशभक्तीचा माहोल निर्माण झाला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

राष्ट्रगीताच्या सुरावटीत तिरंग्याला सलामी देत उपस्थितांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष नितीन इंगोले व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी, सदस्य, माजी सैनिक, पत्रकार, नागरिक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमात नगराध्यक्ष आनंदा माने यांनी शहरवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत एकजुटीचा संदेश दिला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी १ मे ते १५ मे दरम्यान

 घरबसल्या स्वगणना करण्याचे आवाहन केले. वेळेची बचत आणि अचूक माहिती नोंदविण्यासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यात माजी सैनिक, वीर माता आणि वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 

कामगार दिनानिमित्त नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी बांधवांचा विशेष गौरव करून त्यांच्या योगदानाची कदर व्यक्त करण्यात आली.

संपूर्ण कार्यक्रम उत्साह, अभिमान आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments