सांगोला येथे दारूच्या पैशांवरून वाद; पानटपरी चालकास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका पानटपरी चालकास लाथाबुक्क्यांनी
तसेच दगडाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे ११.४५ वाजता हॉटेल श्रीराम परिसरातील पान शॉपजवळ घडली.
सचिन चंद्रकांत गव्हाने (रा. वासुद, ता. सांगोला) यांच्या फिर्यादीनुसार, मिरज–सोलापूर रोडवरील चिंचोली पुलाजवळ
त्यांच्या मालकीची ‘श्रीराम पान शॉप’ ही टपरी आहे. सागर ज्ञानेश्वर जानकर (रा. जानकर वस्ती, पंढरपूर रोड, सांगोला)
आणि अजिंक्य बिरामाने/माने (रा. मार्केट यार्ड शेजारी, सांगोला) हे दोघेही वारंवार दारू पिण्यासाठी पैसे मागून त्रास देत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
गुरुवारी रात्री दोघेही पानटपरीसमोर आले आणि पैशांची मागणी करत शिवीगाळ करू लागले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी फिर्यादीला टपरीबाहेर काढून मारहाण केली.
यावेळी सागर जानकर याने फिर्यादीला जमिनीवर पाडून अंगावर बसून मारहाण केली, तर अजिंक्य माने याने दगडाने डोक्यावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी दोघांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments