Breaking News

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे निधन; पेनूर येथे होणार अंत्यसंस्कार

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे निधन; पेनूर येथे होणार अंत्यसंस्कार


सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख 

यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख (वय ६९) यांचे सोमवारी (ता. ११) अल्पशा आजाराने निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते.

पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. 

त्यांच्या वडिलांनी राज्याच्या राजकारणात विक्रमी अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येत दीर्घकाळ सेवा बजावली होती. 

मात्र, इतक्या मोठ्या राजकीय पार्श्वभूमी असूनही पोपट देशमुख यांनी सक्रिय राजकारणात सहभाग न घेता साधेपणाने जीवन जगले. 

सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपल्या मूळ गावी वास्तव्यास प्राधान्य दिले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात पोपट देशमुख यांचे मार्गदर्शन आणि 

पाठबळ महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. १२) सकाळी ९ वाजता पेनूर (ता. मोहोळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments