Breaking News

न्याय हक्कांसाठी लढणार; सामाजिक संतुलनाला प्राधान्य : ॲड. अक्षयदादा बनसोडे

न्याय हक्कांसाठी लढणार; सामाजिक संतुलनाला प्राधान्य : ॲड. अक्षयदादा बनसोडे


सांगोला प्रतिनिधी : मागासवर्गीय आणि वंचित समाजाच्या न्याय हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करत 

मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विजय तानाजी बनसोडे ऊर्फ अक्षयदादा बनसोडे 

यांची महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 

सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शिफारसीनंतर ही नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना ॲड. अक्षयदादा बनसोडे यांनी सांगितले की, समाजात सामाजिक संतुलन टिकवून ठेवणे 

आणि अनुसूचित जाती तसेच वंचित घटकांवरील अन्यायाविरोधात ठामपणे लढणे हेच आपले प्रमुख ध्येय राहणार आहे. 

SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पीडितांना तातडीची मदत, न्याय आणि पुनर्वसन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस, महसूल, समाजकल्याण विभाग तसेच विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि सुरक्षितता मिळावी, यासाठी दक्षता समितीच्या माध्यमातून सक्रिय भूमिका बजावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ॲड. अक्षयदादा बनसोडे यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments