“जनतेच्या प्रश्नांना थेट विधानसभेत आवाज; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे नागरिकांना खुले आवाहन”
सांगोला : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर Dr. Babasaheb Deshmukh यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि युवकांना थेट संवादाचे आवाहन केले आहे.
दिनांक २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील विविध प्रश्न, समस्या, सूचना आणि नागरिकांच्या अपेक्षा सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.
मतदारसंघातील पाणी, रस्ते, शेती, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच स्थानिक विकासासंदर्भातील प्रश्न नागरिकांनी आपल्या शब्दांत पाठवावेत,
असे आवाहन करण्यात आले आहे. “जनतेच्या भावना आणि अपेक्षा समजल्या तर त्या अधिक ताकदीने विधानसभेत मांडता येतील,” असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
नागरिकांनी आपले प्रश्न, सूचना व संकल्पना
officedrbabasahebDeshmukh@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात किंवा स्टेशन रोड, सांगोला येथील कार्यालयात प्रत्यक्ष लेखी स्वरूपात जमा कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“लोकप्रतिनिधी आणि जनतेतील संवाद अधिक मजबूत व्हावा, नागरिकांचा आवाज थेट विधानसभेत पोहोचावा,” हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.


0 Comments