“प्रशिक्षणातून संघटन बळकट होणार; कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली” — मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
भाजपा सोलापूर ग्रामीणच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीणच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६” हा प्रशिक्षण वर्ग पंढरपूर तालुक्यातील
स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज, गोपाळपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संघटन मजबुती, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया, कार्यविस्तार, विचारधारा
आणि देशासमोरील विविध आव्हानांवर मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांना संघटन कार्याची नवी दिशा मिळेल,
असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख, बीएलए-१ प्रतिनिधी तसेच युवा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रदेश सचिव आ. रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गात विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. मा. पुनीतजी जोशी यांनी “विकास,
संगोपन आणि जबाबदारी जाणीव” या विषयावर बोलताना कार्यकर्त्यांनी समाजाशी सातत्याने संपर्क ठेवून शासनाच्या विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.
मा. महेरदीप महेश पाटणे यांनी “SIR” विषयावर मार्गदर्शन करत मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचे महत्त्व स्पष्ट केले.
बूथ स्तरावर पात्र मतदारांची नोंदणी आणि बोगस नावे कमी करण्यासाठी बीएलए-१ प्रतिनिधींनी सक्रिय राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय संवादक मा. योगेशजी बाचल यांनी “बूथ व्यवस्थापन” या विषयावर बोलताना प्रत्येक बूथ हा पक्षाचा मजबूत पाया असल्याचे सांगितले.
मतदार संपर्क, बूथनिहाय नियोजन आणि निवडणूक व्यवस्थापनात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार मा. योगेशजी (आण्णा) टिळेकर यांनी “कार्यविस्तार”
या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजपा विचारधारा गावागावात पोहोचविण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षण अभियान संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस मा. सचिनजी शिंदे यांनी “विचार परिवार” या विषयावर मार्गदर्शन करत भाजपा ही केवळ राजकीय संघटना नसून
राष्ट्रहिताची विचारधारा असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी वैचारिक बांधिलकी जपत समाजात कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर ग्रामीण (माढा) जिल्हा प्रभारी मा. संजय जगताप यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देत संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला व विविध सत्रांचे कौतुक केले.
“देशासमोरील आव्हाने” या विषयावर श्री भारतजी आमदापुरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी नमूद केले.
मा. अनिकेतजी निकम यांनी “सोशल मीडिया आणि नमो ॲप” या विषयावर डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले.
शासनाच्या योजना आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मा. सुरेशजी हळवणकर यांनी “भाजपा इतिहास” या विषयावर मार्गदर्शन करत पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला.
राष्ट्रहित, संघटनशक्ती आणि विचारधारा या तत्त्वांवर भाजपा उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपकजी वैद्य उपस्थित होते.
आगामी काळात कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने संघटन कार्य करावे, असे आवाहन करत प्रशिक्षणामुळे पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मानले. प्रशिक्षण अभियानाच्या यशस्वी
आयोजनासाठी संयोजक सचिन शिंदे, सहसंयोजक दत्तात्रय जाधव तसेच सर्व आयोजक समितीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.


0 Comments