Breaking News

सांगोला तहसील कार्यालयात गोंधळ; ई-सेवा केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल थेट तहसीलदारांनाच धमकावले;

सांगोला तहसील कार्यालयात गोंधळ; ई-सेवा केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल थेट तहसीलदारांनाच धमकावले;


सांगोला प्रतिनिधी : सांगोला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ई-सेवा व महा-ऑनलाइन केंद्र चालकांच्या बैठकीदरम्यान एका केंद्र चालकाने आक्रमक वर्तन करत

 शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ मे रोजी सायंकाळच्या सुमारास तहसील कार्यालयात तालुक्यातील ई-सेवा व महा-ऑनलाइन केंद्र चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

नागरिकांना शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे तसेच केंद्रांच्या विविध अडचणींबाबत चर्चा सुरू असताना

 पाचेगाव खुर्द येथील महेश मुरलीधर गुरव यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बैठकीदरम्यान अपमानास्पद भाषा वापरणे, अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करणे तसेच वातावरण तणावपूर्ण बनवून 

शासकीय कामकाजात व्यत्यय आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित व्यक्तीकडून फोनवरून दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बाळुताई भागवत यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली

 असून महेश मुरलीधर गुरव (रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments