Breaking News

तरसांचा कोंबडी फार्मवर हल्ला; १३३ देशी कोंबड्यांचा फडशा सांगोला तालुक्यातील जाधववाडीत घटना; शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान

तरसांचा कोंबडी फार्मवर हल्ला; १३३ देशी कोंबड्यांचा फडशा


सांगोला तालुक्यातील जाधववाडीत घटना; शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महूद (सांगोला प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे) अंतर्गत जाधववाडी येथे तरसांच्या हल्ल्यात देशी कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान झाले आहे.

 राजू दिगंबर होवाळ यांच्या पोल्ट्री फार्मवर बुधवारी (दि.६) पहाटे झालेल्या या हल्ल्यात तब्बल १३३ देशी कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या 

पडल्या असून शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजू होवाळ यांनी आपल्या शेतामध्ये देशी कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला असून नियमितपणे कुटुंबातील सदस्य रात्री फार्मवर मुक्कामाला असतात. 

मात्र नातेवाईकांच्या निधनामुळे मंगळवारी रात्री फार्मवर कोणीही नसल्याचा फायदा घेत पहाटेच्या सुमारास तरसांनी हल्ला चढविला.

तरसांनी कोंबडी फार्मची जाळी तोडून आत प्रवेश केला आणि कोंबड्यांवर हल्ला केला. अनेक कोंबड्या जागीच ठार झाल्या, 

तर काही गंभीर जखमी अवस्थेत मृत पडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभाग तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वाढत्या उष्णतेमुळे, रोगराईमुळे आणि चोरट्यांच्या त्रासामुळे 

आधीच अडचणीत असलेल्या कुक्कुटपालक शेतकऱ्यांना आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचाही सामना करावा लागत आहे.

तरस व सायाळ यांसारख्या वन्य प्राण्यांकडून वारंवार हल्ले होत असल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments