Breaking News

“तमाशा कलावंतांवर निर्दयी हल्ला; सांगोल्यात संताप उसळला, ॲट्रॉसिटीखाली कडक कारवाईची मागणी”

“तमाशा कलावंतांवर निर्दयी हल्ला; सांगोल्यात संताप उसळला, ॲट्रॉसिटीखाली कडक कारवाईची मागणी”


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला | प्रतिनिधी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील 

कलावंतांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या घटनेने सांगोला तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत

 सांगोला शहर व तालुक्यातील कलावंत तसेच बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. 

आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील नाशिक–पुणे महामार्गावर तमाशा फडाच्या वाहनाला दुचाकीस्वारांनी कट मारल्याने वाद निर्माण झाला. 

या वादाचे रूपांतर गंभीर प्रकारात होत सुमारे ५० ते ६० जणांना एकत्र करून कलावंतांवर हल्ला केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या हल्ल्यात कलाकारांना मारहाण करण्यात आली असून महिला कलाकारांनाही शिवीगाळ करून बेइज्जत केल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

हा हल्ला जातीय द्वेषातून झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

तमाशा ही राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून अशा घटनांमुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, हे निवेदन तहसीलदार बाळुताई भागवत यांना देण्यात आले. निवेदन सादर करताना बापूसाहेब ठोकळे, 

शाहीर सुभाष गोरे, लकी कांबळे, शिवाजी इंगोले, दीपक ऐवळे यांच्यासह अनेक कलावंत व नागरिक उपस्थित होते.

या घटनेमुळे सांगोला तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments