Breaking News

सांगोल्यात ‘महाराजस्व समाधान शिबीर’चे आयोजन; मंडळ कोळा व संगेवाडी येथे १७ एप्रिलला नागरिकांना थेट लाभ

सांगोल्यात ‘महाराजस्व समाधान शिबीर’चे आयोजन; मंडळ कोळा व संगेवाडी येथे १७ एप्रिलला नागरिकांना थेट लाभ


सांगोला : सांगोला : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयाच्या वतीने 

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सांगोला तालुक्यातील मंडळ कोळा आणि मंडळ संगेवाडी येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन 

विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या सोडवणे,

 प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा आहे.

📌 शिबिरात उपलब्ध सुविधा :

या शिबिरामध्ये नागरिकांना खालील महत्त्वाच्या सेवा व योजनांचा लाभ मिळणार आहे –

प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे

अभिलेख दुरुस्ती व हेल्पडेस्क सुविधा

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा

अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन

भूसंपादन विषयक पत्रके व माहिती

‘एक खिडकी’ सुविधा

ई-मोजणी व ई-सेवा (e-Post, PM Kisan इ.)

सामाजिक अर्थसहाय्य योजना

‘सर्वांसाठी घरे’ पट्टेवाटप यादी तयार करणे

पुरवठा शाखा (शिधापत्रिका सेवा)

श्रवणबाळ व इतर सामाजिक योजना

📣 तहसीलदारांचे आवाहन :

तहसीलदार बाहुबली भागवत यांनी सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

हे अभियान जिल्हाधिकारी सोलापूर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे.

👉 नागरिकांनी आपल्या महसूल संबंधित अडचणी, तक्रारी व अर्जांसह उपस्थित राहून या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments