“पत्नीच्या कारणावरून आईचा बळी! मिरजमध्ये मुलानेच जन्मदात्या आईचा घेतला जीव”
मिरज तालुक्यातील मानमोडी येथे कौटुंबिक वादातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला घरात
ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
मृत महिलेचे नाव संगीता जीवन झेंडे (वय 51) असे असून, आरोपी मुलगा जगदीश जीवन झेंडे (वय 28) याला कुपवाड पोलीस यांनी तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता झेंडे या आपल्या पती व मुलासह झेंडे मळा, मानमोडी येथे वास्तव्यास होत्या.
बुधवारी संध्याकाळी त्यांचे पती रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. त्या वेळी घरात संगीता आणि मुलगा जगदीश दोघेच होते.
याच दरम्यान, जगदीश याची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्याच्या मुद्द्यावरून आई-मुलामध्ये जोरदार वाद झाला.
रागाच्या भरात जगदीशने संगीता यांच्या तोंड, नाक आणि गळा दाबून त्यांचा खून केला.
गुरुवारी सकाळी पती जीवन झेंडे कामावरून घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली.
⚠️ वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय
कुपवाड परिसरात मागील दहा दिवसांत तीन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या घटनांमध्ये तरुणांचा सहभाग वाढताना दिसत आहे.
व्यसनाधीनता आणि कौटुंबिक वाद यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


0 Comments