Breaking News

कृषी क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली कृषी मंत्री मा.ना. दत्ता मामा भरणे यांची भेट

कृषी क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी


आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली कृषी मंत्री मा.ना. दत्ता मामा भरणे यांची भेट


सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून

 डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज राज्याचे कृषी मंत्री मा.ना. दत्तामामा भरणे यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. 

या भेटीत शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांसह कृषी औषधे आणि बी बियाणे विक्रेत्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, पी.एम. किसान योजनेपासून वंचित असलेल्या १३८७ शेतकऱ्यांना

 लवकरात लवकर लाभ मिळावा, तसेच महाडिबीटीच्या पेमेंट सिस्टीममधील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना विविध अनुदान मिळावे.

त्याचबरोबर कृषी औषधे व बी बियाणे विक्रेत्यांच्या समस्यांचा देखील सविस्तर तपासणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिले.

यावेळी मंत्री महोदयांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments