सांगोला पुरवठा विभागाचा आदर्श उपक्रम: पारदर्शक कारभाराने भ्रष्टाचारावर प्रभावी नियंत्रण
सांगोला तालुक्यातील पुरवठा विभागाने प्रशासकीय पारदर्शकतेचा आदर्श स्थापित करत,
नागरिकांसाठी भ्रष्टाचारविरहित सेवा दिली आहे. तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने रेशनकार्ड संदर्भातील कामे थेट
नागरिकांशी संवाद साधून पारदर्शकपणे आणि निशुल्क पूर्ण केली आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रेशणकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे किंवा नवीन रेशनकार्ड मिळवणे यासारख्या कामांत पूर्वी नागरिकांची फसवणूक होण्याच्या तक्रारी आल्या होत्या.
परंतु सध्या सांगोला पुरवठा विभागाने कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाशिवाय थेट नागरिकांना प्रामाणिकपणे सेवा देऊन त्यांना पूर्ण सहकार्य केले आहे.
पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे यांनी स्पष्ट केले की, "रेशनकार्ड हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
त्यासाठी एजंटला पैसे देण्याची गरज नाही. नागरिकांनी थेट तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा."
यामुळे सांगोला तालुक्यात पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा आदर्श निर्माण झाला आहे.
प्रशासनावर नागरिकांचा विश्वास वाढला असून, गरजू नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण होत आहेत.
विशेष सूचना: पुरवठा विभागाच्या नावाने कोणतीही व्यक्ती पैसे मागत असल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


0 Comments