Breaking News

ब्रेकिंग न्यूज..“स्मशानभूमी नाही तर निधी नाही!” – सोलापूरसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा ‘पॉवरफुल’ निर्णय

ब्रेकिंग न्यूज..“स्मशानभूमी नाही तर निधी नाही!” – सोलापूरसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा ‘पॉवरफुल’ निर्णय


सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला गती देताना मूलभूत सुविधांवर भर देत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक महत्त्वपूर्ण आणि ठोस निर्णय घेतला आहे.

 “ज्या गावांत स्मशानभूमी नाही, त्या गावांना विकासनिधी मिळणार नाही” अशी स्पष्ट अट घालत त्यांनी प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत पालकमंत्र्यांनी आता थेट निधीशी ही अट जोडल्याने प्रशासनातही हालचाल सुरू झाली आहे.

🔶 १२० गावांचा प्रश्न मार्गी लागणार

जिल्ह्यातील सुमारे १२० गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असूनही आवश्यक सुविधा नाहीत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री म्हणाले,

“स्मशानभूमीसाठी स्वतंत्र धोरण राबवले जात आहे. ज्या गावांत सुविधा नाहीत, तिथे प्राधान्याने कामे पूर्ण केली जातील.”

🔶 “निधी कमी पडू देणार नाही” – मोठा दिलासा

विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ठाम ग्वाही देत त्यांनी आपल्या खास शैलीत,

“मैं जो बोलता हूँ… वो मैं करता हूँ…”

असे म्हणत सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला मोठा ‘बूस्टर’ देण्याची घोषणा केली.

🔶 जमीन आहे, पण सुविधा नाहीत!

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी रस्ते, पाणी, शेड, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची गरज आहे.

यावर पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की,

“स्मशानभूमी विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल, कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही.”

🔶 ग्रामविकासाचा चेहरामोहरा बदलणार

ग्रामीण भागातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करून त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धारही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला सीईओ कुलदीप जंगम, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

👉 एकूणच, स्मशानभूमीसारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयावर घेतलेल्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments