Breaking News

धक्कादायक ! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

धक्कादायक ! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’;


कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची थरारक घटना घडली आहे.

दारूच्या नशेत रोज होणारी शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून लहान भावाने हे टोकाचे पाऊल उचलले, ज्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 नंदेश्वर येथील मोटे वस्तीवर राहणारा कृष्णात धोंडीबा मोटे (वय ३७) हा गेल्या काही वर्षांपासून दारूच्या आहारी गेला होता.

 दारू पिऊन घरात आई-वडील, पत्नी आणि मुलांना विनाकारण शिवीगाळ करणे आणि

मारहाण करणे हा त्याचा नित्यक्रम झाला होता. त्याच्या याच त्रासामुळे त्याचा लहान भाऊ दत्तात्रय मोटे हा कंटाळून काही काळ बाहेर गावी राहण्यास गेला होता.

 रात्रीचा तो थरार आणि रक्ताचा सडा

दि. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ च्या सुमारास कृष्णात दारू पिऊन घरी आला आणि त्याने पुन्हा धिंगाणा सुरू केला.

 त्याने आपल्या पोटच्या मुलाला, श्री यालाही मारहाण केली. घरातील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र नशेत असलेल्या कृष्णाने कोणाचेही ऐकले नाही.

 रात्री ११ च्या सुमारास वाद विकोपाला गेला. कृष्णाने घरातील कुऱ्हाड हातात घेऊन ती हवेत फिरवत सर्वांना मारण्याची धमकी देऊ लागला

यावेळी राग अनावर झाल्याने धाकटा भाऊ दत्तात्रय याने कृष्णाच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली

 आणि त्याच्या डोक्यात व पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात कृष्णात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

 उपचारापूर्वीच मृत्यू

 रक्तबंबाळ अवस्थेत कृष्णाला तातडीने मंगळवेढा आणि त्यानंतर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

 मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

स्वतःच्या मुलानेच मुलाचा खून केल्याची फिर्याद वडील म्हाळू धोंडीबा मोटे (वय ६०) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.

 या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. 

आरोपी दत्तात्रय मोटे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात भीतीसह हळहळ व्यक्त केली जात आहे.

कौटुंबिक वादाचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने पुन्हा एकदा व्यसनाधीनतेचा भयानक चेहरा समोर आला आहे.

Post a Comment

0 Comments