Breaking News

सांगोला नगरपालिकेतील विद्युत विभागावर गंभीर आरोप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी तीव्र

सांगोला नगरपालिकेतील विद्युत विभागावर गंभीर आरोप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी तीव्र


सांगोला | प्रतिनिधी सांगोला नगरपालिकेच्या विद्युत विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले 

असून, संबंधित विद्युत अभियंत्यावर मनमानी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

 आजी-माजी नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अभियंत्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय कालावधीत नियुक्त झालेल्या या अभियंत्याने ‘मीच सर्व जाणतो’ अशा भूमिकेतून कारभार चालवला आहे.

 नगरसेवकांना विश्वासात न घेता प्रभागांमध्ये कामे केली जात असून, प्रत्येक खरेदी प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप आहे.

 निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांनाही आर्थिक व्यवहारांच्या आधारे संरक्षण दिले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याचबरोबर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची (MSEDCL) वीजबिले वेळेवर न भरल्यामुळे नगरपालिकेला लाखो रुपयांचा दंड आणि व्याज भरावे लागले आहे.

 ही आर्थिक हानी संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. 

त्यामुळे हा दंड संबंधित अभियंत्याकडून वसूल करावा, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात विरोधी पक्षनेत्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप होत असून, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे.

नगरसेवकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

👉 “भ्रष्टाचाराला वाचा फोडून न्याय मिळेपर्यंत लढा कायम”, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments