Breaking News

“सांगोल्यात विकासाचा धडाका! कोट्यवधींच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन; शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सोहळा

“सांगोल्यात विकासाचा धडाका! कोट्यवधींच्या कामांचे


भूमिपूजन व उद्घाटन; शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सोहळा

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषदेच्या वतीने विविध विकास कामांचा 

भव्य भूमिपूजन व उद्घाटन सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

या सोहळ्याचे शुभहस्ते माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते होणार असून, शहराच्या विकासाला गती देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या विविध योजनांअंतर्गत अनेक महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. 

यामध्ये रस्ते विकास, बाजारपेठ उभारणी, सांस्कृतिक सभागृह बांधकाम आणि परिसर सुशोभीकरण अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

🔹 भूमिपूजन होणारी कामे:

चांडोलेवाडी-शेंबडेवस्ती येथे अंतर्गत रस्ते विकास – ₹१.५० कोटी

मिरज रोड, लक्ष्मीनगर येथे रस्ते – ₹३४.२८ लाख

🔹 उद्घाटन होणारी कामे:

आठवडा बाजार मटन मार्केट (फेज-२) – ₹१.५० कोटी

देशमुख वस्ती ते पंढरपूर रोड जोड रस्ता – ₹१.०० कोटी

मोहन राऊत घर ते बायपास रस्ता व सीडी वर्क – ₹१.७५ कोटी

चिंचोली रोडवरील डी.पी. रस्ते व डांबरीकरण – लाखोंची कामे

अयोध्यानगरी येथे सांस्कृतिक सभागृह – ₹५९ लाख

सिद्धिविनायक सोसायटी परिसर विकास – ₹५० लाख

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष आनंदा माने अध्यक्षस्थानी राहणार असून, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, दीपकआबा साळुंखे-पाटील यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments