Breaking News

“मेडशिंगीत 149 लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप; प्रधानमंत्री आवास योजनेला गती”

“मेडशिंगीत 149 लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप; प्रधानमंत्री आवास योजनेला गती”


मेढशिंगी (ता. सांगोला) : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाला गती देण्यासाठी मेढशिंगी येथे मोफत वाळू वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

 महसूल विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत मेढशिंगी, आलेगाव व वाकी या गावांतील एकूण 149 पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास याप्रमाणे मोफत वाळू वाटप करण्यात आले. 

घरकुल बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत आहे.

कार्यक्रमास तहसीलदार भागवत मॅडम, पंचायत समिती सभापती सौ. पूनम इंगवले मॅडम, सहाय्यक गट विकास अधिकारी 

श्री. फुले साहेब, विस्ताराधिकारी (सांख्यिकी) श्री. गंगे साहेब, डॉ. सुदर्शन इंगवले, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच अनेक लाभार्थी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना मिळणार असून, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments