Breaking News

सांगोला हादरले! सामाईक विहिरीवर मोटार चालू करायला गेलेल्या पुतण्याला चुलत्याकडून बेदम मारहाण

सांगोला हादरले! सामाईक विहिरीवर मोटार चालू करायला गेलेल्या पुतण्याला चुलत्याकडून बेदम मारहाण


सांगोला -सामाईक विहिरीवर तू का आला असे म्हणून चुलता व चुलत भावाने फिर्यादी पुतण्यास गच्चीला धरून खाली पाहून शिवीगाळी, दमदाटी करून हाताने, 

लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शिरभावी (ता.सांगोला) येथे घडली आहे.

सुयश मधुकर ताटे (रा. शिरभावी, ता. सांगोला) हे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शेती गटनं.१६५ मधील विहिरीजवळ पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असताना फिर्यादीची पाईपलाईन फुटल्याची दिसून आले. त्यांनी चुलत भाऊ राहुल सहदेव ताटे

 यास आमची पाईपलाईन काफोडली असे विचारल्यावर त्याने फिर्यादीला तू येथे यायचा काहीही संबंध नाही, सामाईक विहिरीवर तू का आला असे म्हणून फिर्यादीच्या गच्चीला धरून खाली पाहून शिवीगाळी, दमदाटी करून हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करु लागला.

त्याचवेळी चुलता सहदेव ज्ञानु ताटे हा तेथे पळत येऊन त्याने त्याच्या हातामध्ये आणलेला लोखंडी कोयता व लाकडी काठीने मला मारण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादीने लोखंडी कोयता त्याच्या हातातून हिसकावून घेऊन 

बाजूला फेकुन दिला.चुलता सहदेव ताटे याने त्याच्याहातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यावर, हातावर मारुन जखमी करून शिवीगाळी दमदाटी करून 

जिवे मारण्याची धमकी दिली आहे.चुलत भाऊ राहुल ताटे याने तेथेच खाली पडलेला दगड उचलून डोक्यात कानाच्या वर मारुन जखमी केले असल्याची घटना घडली आहे.

याबाबत सुयश ताटे याने चुलता व चुलत भावाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोहेकॉ. नवनाथ कोकरे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments