युवासेनेत मोठी नियुक्ती; सोलापूर व माढा लोकसभा संपर्कप्रमुखपदी प्रियांका परांडे व सुजित खुर्द यांची निवड
वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेनेत महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे आणि
सचिव किरण साळी यांच्या शिफारसीनुसार सोलापूर जिल्ह्यातील संघटन बळकट करण्यासाठी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यानुसार, सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी प्रियांका परांडे तर माढा लोकसभा संपर्कप्रमुखपदी सुजित खुर्द यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे युवासेनेच्या संघटनात्मक कामाला गती मिळणार असून, युवकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


0 Comments