Breaking News

“अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण मान्य नाही; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाचा इशारा – नंदकुमार केंगार”

“अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण मान्य नाही; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाचा इशारा – नंदकुमार केंगार”


 पंढरपूर | प्रतिनिधी पंढरपूर येथे आयोजित अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या भव्य परिषदेत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर जोरदार विरोध व्यक्त करण्यात आला. 

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनुसूचित जातींमध्ये ‘अबकड’ पद्धतीने उपवर्गीकरण केल्यास महाराष्ट्रात तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारले जाईल.

परिषदेत बदर समितीच्या अहवालाचा निषेध करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारांचा गैरवापर होत 

असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, सध्या अस्तित्वात असलेले १३ टक्के आरक्षण कायम ठेवण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

केंगार यांनी इशारा देताना सांगितले की, सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास होलार समाज रस्त्यावर उतरेल. येणाऱ्या आषाढी वारीदरम्यान मुख्यमंत्री यांना अडवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 याशिवाय, या विषयावर ऑनलाइन निवेदन सादर करण्यात आले असून, परिषदेत मंजूर ठराव लवकरच मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे येथे बार्टी कार्यालयावर ‘ताळे ठोका’ आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला.

 सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा तीव्र इशाराही त्यांनी दिला.

या परिषदेत अ‍ॅड. किरण जावीर यांनी ठरावाचे समर्थन करत आपले मत व्यक्त केले. 

कार्यक्रमास ज्ञानदेव जावीर, हैदर केंगार, दिपक ऐवळे, रणजीत ऐवळे, मधुकर तसेच गोटू गुळवे भंडगे, सुनील ढोबळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सतीश उर्फ मुन्ना केंगार, अ‍ॅड. चारूशीला गेजगे आणि सिद्धार्थ हेगडे यांनी केले. परिषदेला राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments