“कलावंतांवर अत्याचार असह्य! किरकोळ कारणावरून तमाशा फडातील महिलांचा विनयभंग; दोषींना कडक शिक्षा द्या”
संगमनेर | प्रतिनिधी (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कला जपणाऱ्या, संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या तमाशा कलावंतांवर झालेला हा अमानुष हल्ला समाजमन सुन्न करणारा आहे. किरकोळ कारणावरून जमावाने केवळ मारहाणच नाही, तर महिला कलावंतांचा विनयभंग करत मानवी मूल्यांनाच तिलांजली दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे घडलेल्या या संतापजनक घटनेत राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांना लक्ष्य करण्यात आले.
१ एप्रिल रोजी कार्यक्रम आटोपून प्रवास करत असताना, केवळ दुचाकीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून काही मोटारसायकलस्वारांनी ट्रक चालकाला मारहाण सुरू केली. कलावंत मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले… पण त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
घटना इतक्यावर थांबली नाही…
👉 महिला कलावंतांशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग करण्यात आला
👉 काठ्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि दगडफेक करण्यात आली
👉 बसच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले
👉 सोन्याची चैन आणि सव्वा दोन लाखांची रोकड लुटण्यात आली
हल्लेखोरांनी आणखी साथीदारांना बोलावून हा प्रकार अधिक गंभीर केला. निरपराध कलावंतांवर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.
या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.
अन्यायाविरुद्ध आवाज…
आज प्रश्न फक्त एका फडाचा नाही… तर संपूर्ण कला आणि कलाकारांच्या सुरक्षिततेचा आहे. जे लोक समाजाचे मनोरंजन करतात, संस्कृती जपतात, त्यांच्यावरच असा अत्याचार होणं ही गंभीर बाब आहे.
👉 कलावंतांवर हात उचलणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे!
👉 महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना माफ करता कामा नये!
समाजाने आता गप्प बसून चालणार नाही…
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हाच खरा न्यायाचा मार्ग आहे!


0 Comments