Breaking News

सांगोला : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा; २४ तास आपत्कालीन सुविधा उपलब्ध

सांगोला : खंडागळे मल्टीस्पेशालिटी


हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा; २४ तास आपत्कालीन सुविधा उपलब्ध

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 

अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू असून रुग्णांना २४ तास आपत्कालीन उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. शेखर जवळगे (MBBS, MD Medicine) 

यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांवर उपचार केले जात आहेत. दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, अर्धांगवायू, 

तसेच मलेरिया आणि डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांवर प्रभावी उपचारांची सुविधा येथे उपलब्ध आहे. याशिवाय सर्पदंश व विषबाधा यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने उपचार करण्यात येतात.

हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, तसेच आहार, व्यायाम आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाते. जुनाट आजार असलेल्या रुग्णांसाठी विशेष फॉलोअप सेवा देऊन औषधोपचार नियंत्रित ठेवण्यावर भर दिला जात आहे.

विशेष म्हणजे, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता आणि २४ तास सुरू असलेली आपत्कालीन विभागाची सुविधा यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

सांगोला शहरातील कडलास रोड येथे स्थित असलेल्या या हॉस्पिटलने अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला असून, दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments