सांगोला नगरपरिषदेच्या 72 लाख रूपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषद हद्दीतील पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे, त्याठिकाणी आता रस्त्यांच्या खडीकरणाचे काम चालू होणार
असून ते सुध्दा लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा माने यांनी दिली.
तसेच या 72 लाख रूपयांच्या खडीकरणाच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन बुधवार दि. 22 एप्रिल रोजी सांगोला नगरपरिषदेच्या महिला नगरसेविका यांच्या हस्ते पार पडले.
यामध्ये सांगोला शहरातील कर्मवीर नगर नं. 5 येथे वासूद रोड ते मकरंद जवंजाळ घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, कर्मवीर नगर नं. 5 येथे जवंजाळ घर ते रविकांत मराळ
घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, कर्मवीर नगर नं. 5 येथे मराळ घर ते सदाशिव पुजारी घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, दत्तनगर येथे वासूद रोड ते शिवाजी भोसले घरापर्यंत
रस्ता खडीकरण करणे, दत्तनगर येथे भोसले घर ते म्हेत्रे बिल्डींगपर्यंत रस्ता खडीकरण करणे, दत्तनगर येथे म्हेत्रे बिल्डींग ते वाघमारे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, सदानंद नगर येथे वासूद रोड ते प्रविण मोहिते घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे,
सदानंद नगर येथे मोहिते घर ते संजय चौगुले घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, सदानंद नगर येथे चौगुले घर ते मणेरी घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, विद्यानगर येथे घोंगडे घर ते काटकर घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, विद्यानगर येथे काटकर ते
विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम शाळेपर्यंत रस्ता खडीकरण करणे, विद्यानगर येथे पंढरपूर रोड ते घोंगडे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, फुले चौक येथे रस्ता खडीकरण करणे, मिरज पंढरपूर हायवे ते अलराईन नगर मुल्ला घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे,
अलराईन नगर येथे मुल्ला घर ते तांबोळी किराणा दुकानापर्यंत रस्ता खडीकरण करणे, मिरज रोड ते सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंत रस्ता खडीकरण करणे, सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल ते कांबळे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, यशनगर
येथे लवटे हॉस्पिटल ते खुळपे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे, वाढेगांव वेस येथे रस्ता खडीकरण करणे, कडलास रोड ते पारे रस्ता बालाजी टाईल्सच्या पाठीमागे रस्ता खडीकरण करणे या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले असून लवकरच ही कामे पूर्ण होणार आहेत.
या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. राणीताई माने, आरोग्य सभापती सौ. गोदाबाई बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. छायाताई मेटकरी, मुख्याधिकारी सुधीर गवळी, नगरसेविका
सौ. आशाताई यावलकर, नगरसेविका सौ. सीमाताई सरगर, नगरसेविका सौ. दिव्याणी दौंडे, नगरसेविका सौ. अनिता केदार, नगर अभियंता किरण काळे, अभियंता अनिल भद्रे, इंजि. मोईन इनामदार, संजय दौंडे यांच्यासह तेथील स्थानिक नागरीक उपस्थित होते.


0 Comments