“सांगोल्यात दाक्षता हॉस्पिटलचा मोठा उपक्रम; ३ महिन्यांसाठी मोफत मूत्ररोग व मुतखडा उपचार शिबिर”
शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील दाक्षता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक उपक्रम राबविण्यात येत आहे.
मूत्ररोग व मुतखडा (किडनी स्टोन) संबंधित आजारांवर पूर्णपणे मोफत तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर ११ एप्रिल ते ११ जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चालणार आहे.
या शिबिरामध्ये खालील आजारांवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत:
मूत्रमार्गाचे आजार
प्रोस्टेट ग्रंथीची सूज
किडनीचे आजार
किडनी व मूत्रवाहिनीत खडे
तसेच, नागरिकांना खालील तपासण्या मोफत उपलब्ध असतील:
यूरोफ्लोमेट्री
X-Ray KUB
X-Ray IVP
सोनोग्राफी (USG)
हा उपक्रम प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महत्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत राबविण्यात येत असून, केशरी, पिवळे व पांढरे रेशनकार्ड धारक नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
या शिबिरासाठी आयुष्यमान कार्ड आवश्यक असून, त्यासाठी
आधार कार्ड
रेशन कार्ड
१२ अंकी रेशन कार्ड नंबर
ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments