Breaking News

२१ एप्रिलपासून बेमुदत संप; सांगोला तालुक्यातील ग्राममहसूल अधिकारीही आंदोलनात सहभागी

२१ एप्रिलपासून बेमुदत संप; सांगोला तालुक्यातील ग्राममहसूल अधिकारीही आंदोलनात सहभागी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून, 

या संपात सांगोला तालुक्यातील ग्राममहसूल अधिकारी व मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मा. महाराष्ट्र राज्य ग्राममहसूल अधिकारी संघाने दि. १८ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील मा. अप्पर सचिव यांना निवेदन सादर केले होते.

 त्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्राममहसूल अधिकारी संघटना ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न असल्याने, या संपाला पाठिंबा देत

 सांगोला तालुका ग्राममहसूल अधिकारी संघाने देखील संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्राममहसूल अधिकारी व मंडळ अधिकारी सभासद दि. २१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहेत.

या संपामुळे महसूल विभागातील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

तरीही, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments