सांगोला तालुक्यातील वासुदचा हरित संकल्प! पोलिस व ग्रामस्थांच्या सहभागातून
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)वृक्षारोपणाला नवा उर्जा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी प्रमुख उपस्थिती
सांगोला (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सांगोला तालुक्यातील वासुद येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जुने हायस्कूल परिसरालगत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात
पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवत “हरित गाव” संकल्पना साकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमाला सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्यासह नागपूर ग्रामीण
येथील पोलीस उपनिरीक्षक सौ. भाग्यश्री प्रवीण मराळ आणि सीनियर संशोधक विठ्ठल सपताळ यांनीही सक्रिय सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान सदानंद शिंदे, बंडू शिंदे, संतोष एवळे, बाळासाहेब सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
उपस्थितांनी केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
🌿 “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देणारा हा उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला.
भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, वासुद परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी एकजूट दिसून आली.



0 Comments