सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य कार्यक्रमांची रेलचेल; प्रभातफेरी ते मिरवणुकी पर्यंत उत्साह
सांगोला शहरातील भिमनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
१३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता शहरातून भव्य प्रभातफेरीने होणार असून,
या प्रभातफेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष मा.आनंदा गोरख माने, मा.राजरत्न गाडे (सर) व सामाजिक कार्यकर्ते मा.दामोदर साठे यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर सकाळी ९.३० वाजता समता सैनिक दलाचे संचलन होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व धम्मध्वजास मानवंदना दिली जाणार आहे.
सकाळी १०.०० वाजता भिमनगर येथील जयंती उत्सव मंडपात सिंहासनस्थ पुतळ्याचे पूजन व पंचशील ध्वजारोहण होणार आहे.
तसेच सकाळी १०.३० वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामुदायिक पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, अॅड. शहाजीबापू पाटील, दीपकआबा साळुंखे-पाटील, चेतनसिंह केदार यांच्यासह
आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच सांगोला तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिंहासनस्थ पुतळ्याची व प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात
येणार असून, या मिरवणुकीत ताजुद्दिन कुरेशी, मोहिद्दिन कुरेशी,
हसन कुरेशी, खाजाभाई कुरेशी, नजीर सौदागर, राजु कुरेशी, सुलतान कुरेशी व विनोद रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भिमनगर, सांगोला यांच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments