आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात पोलिसांचा दिमाखदार रूट मार्च; शांतता राखण्याचे आवाहन
सांगोला | प्रतिनिधी आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,
तसेच सण शांततेत व उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी सांगोला पोलिसांच्या वतीने शहरात दिमाखदार पतसंचलन (रूट मार्च) आयोजित करण्यात आला.
या रूट मार्चची सुरुवात सांगोला पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भीमनगर,
वाडेगाव नाका, महादेव गल्ली, शनी गल्ली, परीट गल्ली, हनुमान मंदिर, जय भवानी चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक,
तहसील कार्यालय अशा प्रमुख मार्गांवरून संचलन काढण्यात आले. शेवटी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन या संचलनाचा समारोप करण्यात आला.
या रूट मार्चचे नेतृत्व सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांनी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील, पुजारी, काशीद, महिला पोलीस अधिकारी उबाळे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.
या उपक्रमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये,
यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. तसेच सर्व नागरिकांनी शांतता व सौहार्द राखून उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.


0 Comments