Breaking News

मागून धडकलेल्या चारचाकीने घेतला जीव; सांगोला तालुक्यात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

मागून धडकलेल्या चारचाकीने घेतला जीव; सांगोला तालुक्यात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू, पती गंभीर


सांगोला तालुक्यात सोमवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. 

माळेवाडी ते नाझरे मठ या मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

मृत महिलेचे नाव रतन रावसाहेब रेड्डी (वय ६०, रा. वझरे, ता. सांगोला) असे आहे. तर त्यांच्या पती रावसाहेब रेड्डी (वय ६५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेड्डी दांपत्य सोमवारी आपल्या लेकीकडे कारंडेवाडी येथे गेले होते. तेथून सायंकाळी परतत असताना नाझरे मठ ते माळेवाडी दरम्यान

 त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या (MH 12 KT 1091) क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत रतन रेड्डी गंभीर जखमी झाल्या आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी स्वप्नील तुकाराम रेड्डी यांनी कन्हैया हरीचंद्र सोनवणे (रा. नाझरे) याच्याविरुद्ध बेदरकार व वेगाने वाहन चालवून अपघात घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

👉 या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments