Breaking News

सांगोला तालुक्यात विजेच्या धक्क्याने जनावरांचा मृत्यू; शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

सांगोला तालुक्यात विजेच्या धक्क्याने जनावरांचा मृत्यू; शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत


सांगोला (प्रतिनिधी) – मार्च महिन्यात सांगोला तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या धक्क्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला. 

या दुर्घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून, शासनाच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत वितरित केली जाईल.

18 मार्च रोजी सोमेवाडी येथील शेतकरी महेश काळेल यांच्या चार शेळ्या, डिकसळ येथील दत्तात्रय गेजगे यांच्या एक म्हैस आणि संजय वाघमोडे यांच्या दोन मेंढ्यांचा मृत्यू झाला.

 यासोबतच 26 मार्च रोजी जवळा गावातील धनाजी धुमाळ यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यातही कोंबडवाडी येथील तानाजी कोळेकर यांची गाय आणि वाटंबरे येथील बाळासो गायकवाड यांची म्हैस विजेच्या धक्क्यामुळे मृत्यूमुखी पडल्या.

शेतकऱ्यांच्या पिकांचाही मोठा नुकसान झाला असून पंचनामे सुरू आहेत. शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल.

या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments